पाठयपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत बंद

 

पाठयपुस्तक मंडळाची विभागीय भांडारे

28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत बंद

 

लातूर,दि.22 (जिमाका):- पाठयपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक- बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शौक्षणिक संस्थासाठी दिनांक 28 सप्टेंबर 2021 ते दिनांक 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पुस्तके व कागदाची भांडार स्तरावर वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने या कालवधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगांव, पुणे,नागपूर,औरंगाबाद, लातूर ,नाशिक,कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक,विक्री इत्यादी) बंद राहतील.

सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे प्रभारी भांडार व्यवस्थापक,पाठयपुस्तक भांडार व वितरण केंद्र,लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                        ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत