माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज करावेत

 

माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी

शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज करावेत

 

लातूर,दि.20,(जिमाका):- जिल्हयातील माजी सैनिक / माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी ज्यांचे पाल्य सन 2020-2021  मध्ये 10 वी व 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण घेवुन पास झाले आहेत व वैद्यकीय, अभियांत्रीकी, बी.एस.सी, बी.ए. डिग्री कोर्सेस ,बी.सी.ए., बी.बी. ए. बी फॉर्म, बी.एङ एल.एल.बी. व एम फॉर्म मध्ये शिक्षण घेत आहेत.अशा माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांचे नवीन व जुनी शिष्यवृत्ती 2021-22 साठी अर्ज दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय लातूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन सादर करावेत.

या बाबत फॉर्म व इतर माहिती कार्यालयातून उपलब्ध्‍ करुन घ्यावी असे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक  कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                        ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास