माजी सैनिक / पत्नी/ पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

माजी सैनिक / पत्नी/ पाल्यांनी विशेष गौरव

पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

 

लातूर,दि.20,(जिमाका):-जिल्ह्यातील माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांनी राष्ट्रीय / आंतर राष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरसकार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत,गायन, वादन,नृत्य, इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर / जळीत / दरोडा / अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश / राज्याची  प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्यांना त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी कएरकमी रु. 10 हजार व आंतर राष्ट्रीय स्तरासाठी रु. 25 हजार विशेष गौरव पुरसकार देणे बाबत सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी कळविले आहे.

ज्या माजी सैनिक / विधवांचे पाल्य इयत्ता 10 व 12 वी मंडळाच्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुण उत्तीर्ण झाले आहेत.त्यांनी पण गौरव पुरस्कारासाठी अर्ज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,लातूर येथे करावेत.गौरव पुरस्काराचे अर्ज सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचेकडे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावयाचे आहे.असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                         ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास