माजी नगराध्यक्ष एस.आर. देशमुख यांचे निधन पालकमंत्री अमित देशमुख यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 

माजी नगराध्यक्ष एस.आर. देशमुख यांचे निधन

पालकमंत्री अमित देशमुख यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 

         *लातूर,दि.6,(जिमाका):-* आज लातूर येथे


मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या, माजी नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते एस.आर. देशमुख यांच्या अंत्यविधीस पालकमंत्री अमित देशमुख उपस्थित राहुन त्यांचे अंत्यदर्शन घेतले,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

            संघर्षमय जीवनातुन पुढे आलेले एस.आर.देशमुख हे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपले वाटायचे, राजकारणात वावरताना त्यांच्या वागण्यात कटुता नव्हती, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार तसेच गोतावळा मोठा होता.

           माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे ते खंदे समर्थक होते, आपल्या बरोबरही त्यांचा स्नेह होता त्यामुळे एक प्रकारे ते देशमुख कुटुंबियांचे पारीवारीक सदस्यच होते, त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशी भावना पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

             लातूरच्या जडणघडणीत तसेच सहकार, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणारे आहे, नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल. गणेश देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी अशी भावना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी व्यक्त केली .




 

                                                            000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत