अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत

 

अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी 30 जूनपर्यंत अर्ज  सादर करावेत

 

लातूर,दि.17(जिमाका):- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका , नगरपरिषदशाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०२३-२४ अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासननिर्णय दि . ०७ ऑक्टोबर २०१५ अन्वये राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगीशाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना”राबविण्यात येत आहे. सदर योजना राबविण्याबाबत अल्पसंख्याक विकास विभाग, परिपत्रक दि.३१ मे २०२३अन्वये कळविण्यात आले आहे.

त्यानुषंगाने संस्था चालकांनी या योजनेअंर्तगतचे प्रस्ताव दिनांक ७ ऑक्टोबर,   २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे विहित नमुन्यात रितसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयात दिनांक ३० जून,  २०२३ दुपारी ५.०० वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत असे जिल्हा नियोजन अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत