समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून तपघाले कुटुंबियांचे सांत्वन

 

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून

तपघाले कुटुंबियांचे सांत्वन

*लातूर, दि. 22 (जिमाका):* समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी रेणापूर दिवंगत गिरधर तपघाले यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. पिडीत कुटुंबाकडून घटनेची माहिती जाणून घेवून त्यांना धीर दिला.


समाज कल्याण आयुक्तालयातील नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक अनिल लोंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, पोलीस कॉन्स्टेबल ए. आर. थोरात, समाज कल्याण निरीक्षक संदेश घुगे आदी यावेळी उपस्थित होते.

पिडीत कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबाबतच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांना दिल्या.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत