साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी इच्छुक संस्थेने प्रस्ताव सादर करावेत

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी इच्छुक संस्थेने प्रस्ताव सादर करावेत

·         प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 मेपर्यंत

·         संस्थेची कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक

लातूरदि. 22 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्‍यावतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी संस्थेची निवड केली जाणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेल्या संस्थांनी आपला प्रस्ताव दोन प्रतीत 31 मे2024 पर्यंत लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबाचे सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावीत्यांना रोजगार व स्वंयरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी, यासाठी समाजातील गरजूंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता एकूण 700 प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.

प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजक विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकाची राहील, त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्प्या- टप्प्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. तरी इच्छुक संस्था चालकांनी आपला प्रस्ताव 31 मे2024 पर्यंत दोन प्रतीत सादर करावेत. यातारखेनंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत