कु. परशुराम खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 कु. परशुराम खरात यांच्यावरती हक्क दाखविणाऱ्या

मातापिता, पालक व इतर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन 

लातूर,दि.18 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. परशुराम प्रभाकर  खरात (जन्म दिनांक ११ जानेवारी, २०१३,  वय ११ वर्षे ०७ महिने)  याला दिनांक १० जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. हा  रंगाने सावळा असून चेहरा गोल आहे. उंची ४ फूट ३३ इंच व शरीराने सडपातळ आहे. त्याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला लागलेले निशाण आहे.  

माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत