लातूरमध्ये अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त उद्योजकता मार्गदर्शन सत्र

लातूरमध्ये अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त उद्योजकता मार्गदर्शन सत्र लातूर, दि. 26 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयात अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने उद्योजकाभिमुख युवकांना महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मराठा समाजातील युवकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नोकरीच्या संधी कमी होत असताना युवकांनी आपली कौशल्ये ओळखून आवडीच्या क्षेत्रात उद्योजकता निर्माण करावी. छोट्या व्यवसायातून मोठे उद्योजक घडू शकतात, ज्यामुळे व्यक्ती, कुटुंब, राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. या सत्रात महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी झालेले श्रीराम हांडगे आणि विनायक पवार यांनी आपल्या प्रवासाचे आणि यशाचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, लाभार्थी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामंडळाचे सहायक व्यवस्थापक प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकात महामंडळाची स्थापना आणि जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा सादर करून युवकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन गायत्री राऊत यांनी, तर आभारप्रदर्शन नागेश लामदाडे यांनी केले. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत