लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १० सप्टेंबर रोजी नौदल सैन्य मेळावा

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १० सप्टेंबर रोजी नौदल सैन्य मेळावा लातूर, दि. ०८ (जिमाका) : मुंबई येथील नौदल अधिकारी १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबीत यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व नौदल माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबीत यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत