जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांचे व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांचे व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन • नशा मुक्त भारत अभियानाचा १८ ऑगस्ट रोजी वर्धापन दिन लातूर, दिनांक 05 (जिमाका) : नशा मुक्त भारत अभियानाच्या (NMBA) सहाव्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये व शासकीय, अनुदानित वसतिगृहांमधील विद्यार्थी यांनी राष्ट्रीय व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. कर्मचारी व नागरिकांनी नशा मुक्ती मित्र नोंदणी https://nashamukt.dosje.gov.in/nasha-mukti-mitr या लिंकवरून करावी. केंद्र सरकारच्या https://nashamukt.dosje.gov.in/epledge या अधिकृत संकेतस्थळावरून 'e-Pledge' घेऊन अभियानात सक्रीय सहभागी होत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. व्यसनमुक्तीसाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांक १४४४६ चा देखील प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास