मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू लातूर, दि. 5 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यासाठीची 2026-27 ची अर्ज प्रक्रिया महाडीबीटी 2.0 पोर्टलवर सुरू झाल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यादव गायकवाड यांनी सांगितले. नववी व दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत), साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. पालक व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास