धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ; प्रवासी वाहन चालकांनी मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ;
प्रवासी वाहन चालकांनी मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन
लातूर, दि. 5 (जिमाका) : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य होण्यास सर्व प्रकारचे प्रवासी वाहन चालक पात्र आहेत. प्रवासी वाहन चालकांनी मोठ्या संख्येने मंडळाचे सदस्य व्हावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
टॅक्सी, कॅब, ॲप-आधारित (ओला, उबर), पर्यटन वाहने, इतर सर्व प्रवासी वाहने चालविणारे चालक मंडळाचे सदस्य होऊ शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिकृत संकेतस्थळ ananddighekalyankarimandal.org वर ऑनलाइन नोंदणी करूनही सदस्यत्व प्राप्त करून घेता येईल, असेही चव्हाण यांनी कळवले आहे.
****
Comments
Post a Comment