भूजल संवर्धनासाठी माहितीचा प्रभावी वापर करावा - अपर जिल्हाधिकारी करमकर

वृत्त क्र. : 549 भूजल संवर्धनासाठी माहितीचा प्रभावी वापर करावा - अपर जिल्हाधिकारी करमकर  भूजल माहिती व जलभृत नकाशांकनावर कार्यशाळा लातूर, दि. 4 : केंद्रीय भूजल बोर्डाने भूजल माहितीच्या प्रसारासाठी, डेटा पोर्टल्सची उत्तम निर्मिती केली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय नियोजन, जलसंपदा व्यवस्थापन आणि भूजल संवर्धनासाठी संबंधित विभागांनी या माहितीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी केले. केंद्रीय भूजल बोर्ड (सीजीडब्ल्यूबी), मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे "सीजीडब्ल्यूबीच्या भूजल माहितीचा तसेच जलभृत (Aquifer) नकाशांकन अभ्यासांचा प्रसार व उपयोग" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती करमरकर होत्या. कार्यशाळेस भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मृद व जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, पाणलोट विकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, कृषी विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस केंद्रीय भूजल बोर्डाचे वैज्ञानिक हितेश रामटेके यांनी विचार मांडले. त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (भूजलशास्त्र) उज्ज्वल कुमार यांनी राष्ट्रीय जलभृत नकाशांकन व व्यवस्थापन (NAQUIM) अंतर्गत लातूर जिल्ह्यातील अभ्यास आणि त्यातील निष्कर्षांचे सादरीकरण केले. यावेळी हितेश रामटेके यांनी केंद्रीय भूजल बोर्डाने विकसित केलेल्या ग्राऊंड वॉटर डेटा डाउनलोड पोर्टल आणि INGRES सह विविध ऑनलाइन डेटा पोर्टल्सची माहिती दिली. भूजलविषयक माहितीचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी लातूर जिल्हा भूजल मुल्यांकन अहवाल व वापराबाबत माहिती दिली. कार्यशाळेत "राष्ट्रीय जलभृत नकाशांकन व व्यवस्थापन अहवाल-लातूर जिल्हा" या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. वरिष्ठ तांत्रिक सहायक (भूजलशास्त्र) उज्ज्वल कुमार यांनी आभार मानले. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत