अभियंते जेंव्हा कविता.. मराठी अभिवाचन करतात..!
अभियंते जेंव्हा कविता.. मराठी अभिवाचन करतात..! · सार्वजनिक बांधकाम विभाग , जलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाचा अनोखा उपक्रम लातूर , दि. 27 (जिमाका) : ‘माझ्या मराठीचे काय बोलु कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके ’ एवढा अमाप गोडवा असणाऱ्या माय मराठीचे आपण सगळे शिलेदार. सध्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरु आहे. यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रम सुरु आहेत. पण लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग , जलसंपदा आणि मृदा व जलसंधारण या तीन विभागांच्यावतीने 26 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रम हे मराठी भाषेची गोडी लावणारे , संवर्धन करणारे , लिहिते करणारे होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित या कार्यक्रमांमध्ये अधीक्षक अभियंता ते लीपिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला. शीघ्र कविता , प्रसिद्ध साहित्यिकाच्या कथा कादंबरी , नाटक याच्या उताऱ्याचे अभिवाचन , मराठी शुद्धलेखन , वादविवाद स्पर्धा , मोबाईलचे मनोगत असे एकाहून एक सुंदर कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते. सगळे कार्यक्रम अत्यंत दर्जेदार , भाषेतले सौंदर्य स्थळे याच्...