राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात 132 जणांची नेत्र तपासणी

 

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत

प्रादेशिक परिवहन कार्यालयात 132 जणांची नेत्र तपासणी

        लातूर, दि. 14 (जिमाका) : केंद्र शासनाने 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुरुवारी आयोजित नेत्र तपासणी शिबिरात शिकाऊ, पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी, तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आलेल्या 132 उमेदवारांची नेत्र तपासणी करण्यात आली.

मिरागी नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकामार्फत हे मोफत नेत्र शिबीर आयोजित करण्यात आले होते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, मोटार वाहन निरीक्षक एम. के. लोणारी, समीर इसाक सय्यद, एम. एम. गवारे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नेत्रालयाचे डॉ. स्वप्नील मानकोस्कर, मुकुंद कुलकर्णी, श्रीमती महादेवी गडदे, श्रीमती मयुरी म्हैसुरे यावेळी उपस्थित होते.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बसविले रिफ्लेक्टर

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत लातूर प्रादेशिक परिहवन कार्यालयामार्फत मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक सुनील खंडागळे, कार्यकारी संचालक जे. डी. रणवरे, कार्यलक्षी संचालक एस. एम. देशमुख, मुख्य शेतकरी अधिकारी पी. सी. लावंड, ऊस पुरवठा अधिकारी पी. एस. शेळके, चिफ अकाऊंटंट एस. एस. साळुंके, प्रोजेक्टर मॅनेजर बी. एस. घोगरे यावेळी उपस्थित होते.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु