सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
सामाजिक न्याय विभागांतर्गत
शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या
क्रीडा स्पर्धा उत्साहात
लातूर, दि.24(जिमाका): सामाजिक
न्याय विभागांतर्गत शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
मिळावा, यासाठी समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून आणि लातूर
प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली कला व क्रीडा
अविष्कार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्या
नेतृत्वाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या उपस्थितीत सामाजिक
न्याय विभागाचा जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेचे उद्घाटन एमआयडीसी यथील
अनुसूचित जाती, नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत 18 जानेवारी 2023 रोजी झाले. याप्रसंगी लातूर एम.आय.डी.सी. येथील मुलांची शासकीय निवासी शाळा, मरशिवणी (ता. अहमदपूर) येथील मुलांची शासकीय निवासी
शाळा व तोंडारपाटी (ता. उदगीर) येथील मुलांची शासकीय निवासी शाळा शाळेच्या
विद्यार्थ्यांनी उद्घाटनप्रसंगी मान्यवरांना भारत स्काऊट गाईडतर्फे मानवंदना
देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हाती मशाल देवून प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धेला
सुरुवात करण्यात आली.
बावची (ता. रेणापूर) येथील मुलींची शासकीय निवासी
शाळेत 19 जानेवारी 2023 रोजी मुलींच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये बावची
येथील मुलींची शासकीय निवासी शाळा, जाऊ (ता. निलंग) येथील मुलींची
शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थीनींनी जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेमध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, 100x4 रिले, खो-खो व रस्सीखेच आदी स्पर्धांमध्ये भाग घेतला.
Comments
Post a Comment