जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

 

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

·         आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

लातूर, दि. 06 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालयात आज पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते पहिले मराठी वृत्तपत्रकार व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विभागीय माहिती कार्यालातील सहायक संचालक डॉ. श्याम टरके, माहिती अधिकारी तानाजी घोलप, उपसंपादक रेखा पालवे, वरि
ष्ठ लिपिक विवेक डावरे, 
विशाखा शेंडगे, मनीषा कुरूळकर, भीमा पडवळ, अहमद बेग, श्री. टोकले, सिध्देश्वर कोंपले, प्रवीण बिदरकर, बालाजी केंद्रे, अशोक बोर्डे, व्यंकट बनसोडे यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा