ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी 19 जानेवारीपर्यंत निवडणूक खर्च सादर करण्याचे आवाहन

 

ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी

19 जानेवारीपर्यंत निवडणूक खर्च सादर करण्याचे आवाहन

·      बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांनाही सादर करावा लागणार खर्च

लातूर, दि. 13 (जिमाका) :  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 351 ग्रामपंच्यातींची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2022 महिन्यात झाली. त्यानुसार 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान आणि 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी झाली. ही निवडणूक लढविलेले, तसेच बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या संपूर्ण खर्चाचा हिशोब 19 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित तहसील कार्यालयातील खर्च पथक प्रमुखाकडे विहित रीतीने जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

राज्‍य निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशानुसार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उमेदवाराने एकूण खर्चाचा तपशील 30 दिवसांत तालुकास्तरावरील संबंधित प्राधिकृत खर्च पथकास विहित रितीने सादर करणे आवश्यक आहे. राज्‍य निवडणूक आयोगाने विहित वेळ व रितप्रमाणे खर्चाचा तपशील सादर न केल्यास किंवा उमेदवाराचा एकूण खर्च मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा वेळ व रितयांचे पालन झाले नसेल, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियामाचे कलम 14 ब नुसार संबंधित उमेदवारास पाच वर्षांसाठी अनर्ह करण्याबाबतची तरतूद आहे.

त्यामुळे डिसेंबर 2022 मध्‍ये झालेल्‍या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक लढविणारे, तसेच  बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या एकूण खर्चाचा हिशेब संबंधित तालुक्‍यातील तहसिल कार्यालयाने प्राधिकृत केलेल्‍या खर्च पथकाकडे 19 जानेवारी 2023 पर्यंत विहित रितीने सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु