कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

*लातूर,दि.23(जिमाका):* राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतात. तरी या पुरस्कारासाठी शेतकरी, शेतकरी गट, संस्थांनी आपले प्रस्ताव ३० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

कृषि विभागाशी संबंधित पुरस्कारांमध्ये शेती क्षेत्राशी संबंधित उद्यान पंडीत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी गट, कृषि संलग्न संस्था पात्र आहेत.

कृषि पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहीतीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.

                                                              ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा