राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत हेल्मेट वापराविषयी जनजागृती

 

राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत

हेल्मेट वापराविषयी जनजागृती

            लातूर, दि. 13 (जिमाका) : केंद्र शासनाने 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत गुरुवारी निलंगा कॅम्प येथे शिकाऊ तसेच पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन व चालकाचे कर्तव्य समजावून सांगण्यात आली.

            मोटार वाहन निरीक्षक बजरंग कोरवले, एस. आर. साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

वाहतूक नियमांविषयी जनजागृती

            राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ तसेच पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या उमेदवारांना चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचे महत्त्व पटवून देण्यात आले. सहायक मोटार वाहन निरीक्षक रोहित मामडे, नितेश उमाळे यावेळी उपस्थित होते.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु