विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालिकेच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया

 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात*

*बालिकेच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया*

*लातूर, दि. 12 (जिमाका) :*  अवघ्या तीन महिन्यांची बालिका डोक्याला मार लागल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये आठवड्यापूर्वी दाखल झाली होती. मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी बालिकेची प्राथमिक तपासणी करून तिच्या डोक्याचा सी. टी. स्कॅन केला असता मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला असल्याचे निदान झाले. त्यामुळे अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून मेंदूविकारतज्ज्ञ  डॉ. नितीन बरडे यांनी  या तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या मेंदूवर त्वरीत शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचविण्यात यश मिळविले.

औसा तालुक्यातील तीन महिन्यांची एक बालिका डोक्याला मार लागल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 4 जानेवारी रोजी दाखल झाली. यावेळी मेंदूविकारतज्ज्ञ  डॉ. बरडे यांनी बाळाची प्राथमिक तपासणी केली व अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून बालिकेच्या डोक्याचा सी. टी. स्कॅन केला. त्यावेळी मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. बालिकेच्या शरीरातील कमी झालेले रक्ताचे प्रमाण आणि कमी वय यामुळे तीन वेळा रक्त द्यावे लागले. डॉ. बरडे यांनी आपल्या शल्यचिकित्सा कौशल्याचा वापर करून अवघ्या एक तासात त्या बालिकेच्या मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे बालिकेचा जीव वाचला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे बालिकेच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.

            या शस्त्रक्रियेत डॉ. नितीन बरडे यांना शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गंगाधर अनमोड, डॉ. गणेश स्वामी,  डॉ. मेघराज चावडा,  डॉ. शोभा निसाले, डॉ. पुष्कराज बिराजदार, डॉ. चंद्रशेखर हाळणीकर, डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ. निखील काळे व भुलतज्ज्ञ  विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र चौहाण, डॉ. किरण तोडकरी, डॉ. व्यंकट जोशी,  बालरोग विभागप्रमुख डॉ. शिवप्रसाद मुंदडा व त्यांचे सहकारी, परिचारीका यांचे सहकार्य लाभले.

            मेंदुवरील ही शस्त्रक्रिया अतिशय जिकीरीची व गुंतागुंतीची होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील सर्व संबंधित विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. अवघड शस्त्रक्रियाही या रुग्णालयात यशस्वीपणे पार पाडल्या जातात. त्यामुळे रुग्णालयातील सोयी -सुविधांचा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ लातूरसह आजुबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना होईल, असा विश्वास विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी व्यक्त केला.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु