प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण
प्रजासत्ताक
दिनानिमित्त गुरुवारी
जिल्हा
क्रीडा संकुल येथे होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण
लातूर,
दि. 19 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताक
दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवारी
(दि. 26) सकाळी 9.15 वाजता आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
इतर सर्व कार्यालये व
शैक्षणिक संस्थांनी सकाळी सकाळी साडेआठ ते दहापर्यंत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित
करू नये. इतर सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी सकाळी साडेआठ पूर्वी किंवा
सकाळी दहानंतर आपला ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावा, असे जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल
येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाला नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी
राष्ट्रीय पोशाख परिधान करून नियोजित वेळेच्या 15 मिनिटे अगोदर ध्वजारोहण स्थळी
उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment