आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

 

आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या

नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे

-      जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

लातूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील ज्या नागरिकांची आधार नोंदणी करून दहा वर्षे इतका कालावधी पूर्ण झाला आहे. या दहा वर्षात त्यांनी एकदाही आधारकार्ड मधील माहितीत बदल केलेला नाही, असह नागरिकांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे

केंद्र शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधारकार्ड नोंदणीची मोहीम राबविण्यात आली. सद्यस्थितीत बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड तयार करण्यात आले आहे. शासनाच्या नियमावलीनुसार दहा वर्षांनी आधारकार्ड अद्ययावत (अपडेट) करणे आवश्यक आहे. आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने पत्ता, बोटाचे ठसे, नावातील चुका, माबाईल क्रमांक यासारख्या माहितीमध्ये अनेक बदल होतात. आधारकार्डला या माहीतीची नोंद असल्याने याबाबतची माहिती अद्यायवत होणे आवश्यक आहे.

दहा वर्षांनी आधार केवायसीकरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी आधारकार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप एकदाही त्यामधील माहिती अद्ययावत केलेली नाही, अशा नागरिकांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जावून केवायसी करून घ्यावी. आधार अपडेट न केल्यास भविष्यात आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी आधारकार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, अशा नागरिकांनी आपले आधारकार्ड ई-केवायसीदेवून अपडेट करावे.

*आधारकार्ड अद्ययावत करणे यांच्यासाठीच बंधनकारक*

ज्या नागरिकांनी आधारकार्ड काढले आहे, त्यांनी दहा वर्षात एकदाही त्यामध्ये पत्ता, मोबाईल नंबर, बोटाचे ठसे, नावातील चुका दुरुस्त केल्या नसतील, त्यांनी आधार अपडेट करणे बंधनकारक आहे. ज्यांनी मागील दहा वर्षात फोटो किंवा इतर कोणताही बदल केला असेल, त्यांनी आधार अपडेट करण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*जिल्हा आधार नियंत्रण समीतीची स्थापना*

केंद्र शासनाच्या आधार अधिनियम 2016 मधील नियमामध्ये सुधारणा करण्यात आली असून, त्यानुसार जिल्हा आधार नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या राजपत्राव्दारे 18 वर्षांवरील नागरिकांनी आपले आधारकार्ड काढले नसल्यास व 18 वर्षानंतर पहिल्यांदाच आधार नोंदणी करीत असल्यास, अशा नागरीकांची आधार नोंदणी ही केवळ निश्चित केलेल्या ठराविक आधार केंद्रावरच होईल.

 

                                                              ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा