लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वॉकेथॉन रॅली संपन्न
लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून
वॉकेथॉन रॅली संपन्न
*लातूर,
दि.18(जिमाका):* 17 जानेवारी 2023 रोजी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर तसेच शहर वाहतुक शाखा, महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दक्ष अॅकडमी, पोलिस दल यांच्या संयुक्त विदयमाने
जिल्हा क्रिडा संकूल ते राजीव गांधी चौक या मार्गावर 17 जानेवारी
2023 रोजी सकाळी 06:45 वाजता वॉकेथॉन रॅलीचे आयोजन
करण्यात आले होते.
यावेळी रॅलीचे उदघाटन उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी विजय चिंतामणी भोये यांच्या हस्ते
हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्यावेळी अशितोष बारकुल, समिर
सय्यद,मो.वा.नि. श्रीमती. सविता पवार मो. वा. नि. सचिन
बंग मो.वा.नि शांताराम साठे मो.वा.नि, कोरवले
मो.वा.नि. सुनिल शिंदे मो.वा.नि. डी.के.लॉढे, वसंत भिसे, उमेश सांगळे,
आर.जी. कुलकर्णी, सी.एस. वाघमारे, ड्राईव्हिंग स्कूल
चालक मालक अदि या रॅलीमध्ये सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग
नोंदविला होता. या रॅलीमध्ये शाळेच्या लहान मुलांचा सहभाग होता. तसेच क्रिडा
संकुलमधील लोकांनीही उत्स्फुर्त सहभाग नोंदविला व
जवळपास रॅलीमध्ये 300 लोकांनी सहभाग नोंदविला होता.
या रॅलीमध्ये जन-जागृती
करण्यासाठी विविध स्लोगन सडक सुरक्षा -जीवन रक्षा, वाहतूकीचे
नियम पाळा-अपघात टाळा, रस्ता ही तुमचाच, वेळ ही तुमचीच, वाहन
चालविताना घाई केली तर मृत्यु ही तुमचाच, मनाचे ब्रेक-उत्तम ब्रेक, वेग
कमी-जीवनाची हमी, वाहन चालविण्याची अति घाई-संकटात नेई,
लक्ष रोडकडे असू द्या- फोनकडे नको, अशा घोषणांव्दारे जनजागृती करण्यात आली.
वाकेथॉन रॅलीचे समारोप क्रिडा संकुल येथे करण्यात आला. या प्रसंगी प्रादेशिक
परिवहन कार्यालय, लातूर यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने तयार करण्यात
आले.
रक्तदान शिबीर :-
केंद्र शासनाने राज्य
रस्ता सुरक्षा सप्ताह दि 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केला आहे. दि.
17 जानेवारी 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर यांच्या वतीने रक्ताचा
तुटवडा लक्षात घेवून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय,
लातूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भालचंद्र ब्लड
बँक सुभाष चौक येथील कर्मचारी संजय कुलकर्णी PRD, जयप्रकाश सुर्यवंशी, तंत्रज्ञ,
फरहान शेख, तंत्रज्ञ, संतोष पाटील, सुरेखा हजारे, तंत्रज्ञ, अमर पुरबूरे, चालक,
तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील समीर इसाक सय्यद, मोटार वाहन निरीक्षक, एम,
एम, गवारे, मोटार वाहन निरीक्षक, मन्मथ कुदळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, उध्दव
चव्हाण, कनिष्ठ लिपिक, उमेश सांगळे, कनिष्ठ लिपिक, दिलीप कांबळे, कनिष्ठ लिपिक आदी
मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment