लातूर ऑफिसर्स क्लबचे दोन खेळाडू महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रवाना
लातूर ऑफिसर्स क्लबचे दोन खेळाडू
महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रवाना
*लातूर,
दि.12 (जिमाका) :* महाराष्ट्र स्विमिंग
असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या टाइम ट्रायलमध्ये लातूर ऑफिसर्स क्लबचे खेळाडू अभय
रवीकुमार देवकते आणि औदुंबर मेठाले हे पात्र ठरले आहेत. पुणे येथे होणाऱ्या
महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या दोन्ही
खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
लातूर ऑफिसर्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष
जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. उपजिल्हाधिकारी तथा सचिव
जीवन देसाई, कोषाध्यक्ष
डॉ. विश्वास कुलकर्णी, सहसचिव डॉ. अजय जाधव, क्रीडा
समिती प्रमुख अजित भुतडा, सांस्कृतिक समिती प्रमुख अजय अग्रोया, अॅड.
सुरज साळुंके, पालक रवीकुमार देवकते, अॅड. औदुंबर मंठाळे आदींनी या खेळाडूंचे
अभिनंदन केले.
Comments
Post a Comment