जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशाची संधी

 

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशाची संधी

·       ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

·       31 जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज

·       29 एप्रिल रोजी होणार प्रवेश परीक्षा

लातूर, दि. 12 (जिमाका) :  जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवरी 2023 असून प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होईल.

प्रवेश अर्ज निशुल्क ऑनलाइन भरण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाइटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. या प्रमाणपत्रावर पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा  सही शिक्का, पालकांची सही, विद्यार्थ्याची सही व फोटो असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज  https://cbseitms.rcil.gov.in/nvs किंवा https://navodaya.gov.in या संकेतस्थळावरून भरता येईल.

इयत्ता सहावीसाठी  निवड चाचणी परीक्षेस बसणारा विद्यार्थी इयत्ता तीसरी, चौथीमध्ये सलगपणे  उत्तीर्ण होऊन कोणताही खंड न पडता शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाचवीमध्ये लातूर जिल्ह्यात शिकत असावा. त्याचा जन्म दिनांक 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस पकडून) दरम्यानचा असावा. त्याचे पालक लातूर जिल्ह्याचेच रहिवासी असावेत, अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास अपात्र असतील.

इतर मागास  प्रवर्गात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च 2023 पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे (ओ. बी. सी.- फॉर्म नंबर 09) जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी  (प्राथमिक), लातूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, आपल्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी किंवा जवळच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु