‘चला जाणूया नदीला’ अभियानाविषयी प्रभात फेरीद्वारे जनजागृती जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन
‘चला
जाणूया नदीला’ अभियानाविषयी
प्रभात
फेरीद्वारे जनजागृती
· जलतज्ज्ञ
डॉ. राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन
लातूर, दि. 12 (जिमाका) : ‘चला जाणूया नदीला’
अभियान अंतर्गत मांजरा नदी जलसंवाद यात्रेविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित प्रभात
फेरीला जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल येथून
सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती,
राज्य
शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, लातूर
जिल्हाधिकारी कार्यालय, मानवलोक संस्था आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय
समितीच्यावतीने ‘चला जाणूया नदीला’ अभियान राबविण्यात येत आहे.
मांजरा नदी जलसंवाद
यात्रेचे मराठवाडा समन्वयक अनिकेत लोहिया, तहसीलदार स्वप्नील पवार, डॉ. सुमंत
पांडे, जयाजी पाईकराव, रमाकांत कुलकर्णी, मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे लातूर
जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय गवई, सहसमन्वयक कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले
यावेळी उपस्थित होते.
‘समजून घेवूया नदीचं
मन, मिळून आपण सर्वजण’, ‘संकल्प स्वच्छतेचा, प्रश्न मिटेल नदीच्या अस्तित्वाचा’,
‘स्वच्छतेचा संस्कार जुना, कृतीत आणू पुन्हा पुन्हा’, ‘नदीचं प्रदुषण, जीवघेण्या
आजराला निमंत्रण’ यासारख्या घोषवाक्यांचे फलक हाती घेवून शहरातील विविध
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा
क्रीडा संकुल येथून सुरु झालेली प्रभात फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक
हॉटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमार्गे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात
आल्यानंतर प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला.
नदीसंवर्धनासाठी
युवकांनी पुढाकार घ्यावा : पद्मभूषण डॉ. कुकडे
मानवी जीवन हे पाण्यावर
अवलंबून आहे. निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी आवश्यक पाणी, हवा, वृक्ष आदी संपदा
भरभरून दिली. मात्र, अति हव्यासापोटी आपण त्याची नासाडी केली. मानवी अस्तित्व
टिकविण्यासाठी या संपदेचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे चला जाणूया नदीच्या
माध्यमातून नदीसंवर्धनासाठी होत असलेला जागर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे
आवश्यक असून यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे
यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित जनजागृती कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा
बिडवे होते. संस्थेचे संचालक अॅड. श्रीकांत उटगे, प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश
मौने यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment