महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

 

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील

शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी लॉगीनवरील प्रलंबित, नवीन भरावयाचे अर्ज मंजुरीकरिता महाविद्यालयामार्फत समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या लॉगीनवर ऑनलाईन पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.

शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (फ्रीशीप), राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास दिनांक 21 सप्टेंबर 2022 पासून सुरुवात झाली आहे.

अद्यापही अनेक महाविद्यालयांच्या कॉलेजलॉगीनवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे पाच हजार 313 अर्ज प्रलंबित आहेत. तसेच विद्यार्थी लॉगीनवर 796 अर्ज प्रलंबित आहेत. महाविद्यालयातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे पाच हजार 622 अर्ज कॉलेजलॉगीनवर, तर विद्यार्थी लॉगीनवर 680 अर्ज प्रलंबित आहेत. शिष्यवृत्तीची विहीत कालमर्यादा लक्षात घेवून सर्व संबंधित महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी आपले लॉगीनवरून प्रलंबित तसेच नवीन भरावयाचे अर्ज मंजुरीसाठी महाविद्यालयामार्फत पात्र प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर यांच्या लॉगीनला ऑनलाईन फॉरवर्ड करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडीतयार करून अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी नवीन नॉन आधार युजर आयडीतयार करू नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास आणि एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयाची राहील, असे समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु