सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 01 : राज्यातील सहकार चळवळीच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर राज्य सरकारमार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी सहकारी संस्थांनी 18 जुलै 2025 पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंध अथवा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे. सहकार पुरस्कारांतर्गत 'सहकार महर्षी' (1), 'सहकार भूषण' (21) आणि 'सहकार निष्ठ' (23) असे एकूण 45 पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, अनुक्रमे 1 लाख, 51 हजार आणि 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. निवड प्रक्रियेत संस्थेची नोंदणी, सभा, नफा-तोटा, थकबाकी, लेखापरीक्षण, निवडणूक, व्यवस्थापन, प्रशिक्षण आदींसाठी 50 गुण, संस्था प्रकारानुसार विशेष निकषांसाठी 35 गुण आणि सहकार चळवळीतील योगदान, जनसेवा, धर्मादाय कार्यासाठी 20 गुणांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी पात्र संस्थांची अंतिम निवड शासनस...