सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम
लातूर, दि. २० (जिमाका): राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवार, २१ जून २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री श्री. पाटील यांचे २१ जून रोजी सकाळी ६ वाजता लातूर येथे आगमन होईल व अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सकाळी ७.३० वाजता शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी ९ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे राखीव. सकाळी १०.३० वाजता शिरूर ताजबंद येथील चोबळी रोडवरील बालाजी माळी यांच्या माळी ट्रेडर्सच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे राखीव. दुपारी ३ वाजता उदगीरकडे प्रयाण करतील.
दुपारी ४ वाजता सहकार मंत्री श्री. पाटील हे उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयाजवळ इनलाईट फिटनेस व्यायाम शाळेस सदिच्छा भेट देतील. दुपारी ४.२० वाजता दुधिया हनुमान दर्शन व सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता उदगीर येथील बिदर रोडवरील मेथोडीस्ट शाळेच्या समोर आकाश फाउंडेशनच्या नवीन शाखेच्या शुभारंभ व इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सायंकाळी ६ वाजता उदगीर येथून लातूरकडे प्रयाण करतील. औसा रिंगरोडवरील हॉटेल वाडा येथे सायंकाळी ६.५० वाजता सुदर्शन विद्यालय व जिम्नॅस्टिक लातूर यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहतील. रात्री ८ वाजता पंढरपूरकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment