चाकूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु
चाकूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु
लातूर, दि. 12 (जिमाका): राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत चाकूर येथे झरी रोडवरील चालविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रोड या संस्थेत 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या व इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील विद्यालयीन, इयत्ता अकरावी, बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत नाष्टा, भोजन, निवासाची व्यवस्था असून, क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, ड्रेसकोड, अॅप्रन, शैक्षणिक सहल, क्रीडा साहित्य इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. विद्यार्थी चाकूरचा स्थानिक रहिवासी नसावा.
प्रवेशासाठी मागील वर्षाचे गुणपत्रक, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड, टीसी इत्यादी इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. https://hmas.mahait.org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गृहपाल के. एम. फड यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment