आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना मिळणार पथकरातून सूट
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या
वारकऱ्यांच्या वाहनांना मिळणार पथकरातून सूट
· प्रादेशिक परिवहन कार्यालयातून सवलत पास प्राप्त करून घ्यावा
लातूर, दि. 24: आषाढी वारी -2025 पंढरपुरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या व भाविकांच्या हलक्या व जड वाहनांसाठी 18 जून, 2025 ते 10 जुलै, 2025 या कालावधीत पथकरातून सूट देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक पथकर सवलत प्रवेशपत्र टोल फ्री पास) लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा.
वारकऱ्यांच्या व भाविकांच्या हलक्या व जड वाहनांना पथकरातून सूट देण्याच्या कार्यवाहीसाठी 18 जून, 2025 ते 10 जुलै, 2025 या कालावधीत मदत कक्ष स्थापन केलेला आहे. तरी पंढरपूर आषाढी यात्रा 2025 साठी टोल नाक्यावरुन जाणाऱ्या व येणाऱ्या जड व हलक्या वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पथकर सवलत प्रवेशपत्र (टोल फ्री पास) प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment