शासकीय महिला वसतिगृह आणि मुलांच्या बालगृहासाठी भाडेतत्त्वावर इमारतींची आवश्यकता
शासकीय महिला वसतिगृह आणि
मुलांच्या बालगृहासाठी भाडेतत्त्वावर इमारतींची आवश्यकता
लातूर, दि. 5 (जिमाका): येथील शासकीय विद्या महिला वसतिगृह यासाठी 100 प्रवेशितांसाठी 5,500 स्क्वे. फुट जागेची इमारत भाडेतत्त्वावर आवश्यक आहे. या इमारतीत 10 महिलांमागे एक स्नानगृह, 7 महिलांमागे एक स्वच्छतागृह, पाणी व विद्युत व्यवस्था आणि रुग्णालयाच्या जवळ असण्याचा निकष आहे. शासकीय नियमानुसार ही इमारत भाडेतत्त्वावर देण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कौटुंबिक न्यायालयाजवळ, लातूर येथे संपर्क साधावा.
तसेच, लातूर येथील शासकीय मुलांचे बालगृह येथील 50 अनाथ बालकांसाठी 6,000 स्क्वे. फुट जागेची इमारत भाडेतत्त्वावर आवश्यक आहे. या इमारतीत निवासी स्वयंपाक खोली, मनोरंजन कक्ष, खेळाचे मैदान, 12 स्नानगृहे आणि 12 स्वच्छतागृहे असणे आवश्यक आहे. यासाठीही इच्छुकांनी वरील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment