लातूर येथील सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृहात प्रवेशाबाबत आवाहन

 लातूर येथील सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृहात प्रवेशाबाबत आवाहन

 

लातूर, दि. 13:  लातूर येथे आधुनिक पध्दतीच्या सर्व सोयी उपलब्ध असलेले स्वच्छ, सुंदर व कमी  दरामध्ये माजी सैनिक मुलां-मुलींचे वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात लातूर येथे सन  2025-2026 मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी व आजी सैनिकांच्या तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या मुलां-मुलींना पहिल्या टप्प्यात प्रवेश दिला जाईल. तसेच खाजगी शिकवणीचे वर्ग जे की पूर्ण शैक्षणिक वर्ष चालू असणारे व कमीत कमी  दररोज 6 तासपेक्षा जास्त  शिकवणी घेत असलेल्या बोनाफाईडधारक माजी सैनिकआजी सैनिक तसेच युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना दुसरा टप्प्यात प्रवेश देण्यात येईल. तसेच ही प्रवेश प्रक्रियेत जागा पूर्ण भरल्या नसल्यास उर्वरित जागेसाठी पुणे सैनिक कल्याण विभागाचे संचालक यांच्या परवानगीने नागरी मुलां-मुलींना तिसरा टप्प्यात वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल.

तरी सन 2025-2026 करिता प्रवेश घेण्यास  इच्छूक असणाऱ्या मुलां-मुलींसाठी 16 जून 2025 पासून प्रवेश पुस्तिका वाटप सुरू करण्यात येत आहे. तरी सर्व माजी सैनिकआजी सैनिक तसेच युध्द विधवा माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे(नि.) यांनी कळविले आहे.

वसतिगृहात खालील नमुद केलेल्या सुविधा उपलब्ध आहेत :-

उत्तम भोजन व्यवस्थाराहण्याची उत्तम सोयअभ्यास  वाचनालयाची सोयमनोरंजन व्यवस्थाखेळासाठी प्रशस्त मैदानगरम पाण्याची सोयसी. एस. डी. कॅन्टीन व ईसीएचएस (ECHS) ची सुविधासुरक्षेची योग्य सोय24 तास लाईट  पाण्याची सोयशिस्तबंध व प्रसन्न वातावरणसकाळचा व्यायाम .  

युध्द विधवा व माजी सैनिक विधवांच्या सर्व पाल्यांना राहण्याची व भोजन  व्यवस्था निशुल्क आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया ही वसतिगृह प्रवेश पुस्तिकेतील नियम व अटीप्रमाणे नमूद प्राधान्यक्रमाने प्रवेश निश्चित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक, अधिक्षिका, सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृह, अंबाजोगाई रोड, मेडीकल कॉजेलसमोर, सैनिक संकुल, लातूर येथे किंवा 02382-228544 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांनी केले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन