इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. 24 : माध्यमिक शालांत परीक्षा 23 जून, 2025 ते 8 जुलै, 2025 या कालावधीत 4 परीक्षा केंद्रावर व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 24 जून, 2025 ते दि. 11 जुलै, 2025 या कालावधीत 10 परीक्षा केंद्रावर पार पाडली जाणार आहे. या सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या परीक्षा केंद्रांमध्ये लातूर येथील शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, परीमल कनिष्ठ महाविद्यालय, कॉक्सीट ज्युनियर कॉलेज, त्रिपुरा ज्युनियर कॉलेज, अहमदपूर येथील कस्तूरबा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, औसा येथील अजीम ज्युनियर कॉलेज, चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवनी ज्युनियर कॉलेज, देवणी येथील विवेक वर्धिनी ज्युनियर कॉलेज, निलंगा येथील महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज, उदगीर येथील शिवाजी ज्युनियर कॉलेज, लातूर येथील श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालय, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, निलंगा येथील जिल्हा परिषद मुलांचे माध्यमिक विद्यालय, उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कूलचा समावेश आहे. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही व्यक्तीस अथवा वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. 24 जून, 2025 ते 11 जुलै, 2025 या कालावधीमध्ये सकाळी 9 ते दुपारी 6 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन