‘एचआरएसपी’ नंबर प्लेट नसल्यास 16 जूनपासून वाहनांचे कामकाज नाही
‘एचआरएसपी’ नंबर प्लेट नसल्यास 16 जूनपासून वाहनांचे कामकाज नाही
लातूर, दि. 05 (जिमाका) : राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एसएसआरपी) बसविण्याचा निर्णय घेतला असून 30 जून 2025 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे 16 जून 2025 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनाचे कोणतेही कामकाज प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत केले जाणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे. मात्र, वाहन मालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास कामकाज करुन दिले जाणार आहे.
1 एप्रिल, 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवाना विषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे इत्यादी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी नंबरप्लेट बसविल्याशिवाय 16 जून, 2025 पासून होणार नाही. तरी वाहन मालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास कामकाज करुन दिले जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment