मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती 26 ऑक्टोबरला लातूरमध्ये

 मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती 26 ऑक्टोबरला लातूरमध्ये

·        नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन

लातूर, दि. 20 (जिमाका) : मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करीत आहेत. ही समिती 26 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येणार असून नागरिकांनी त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे समितीसमोर सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता समितीची बैठक होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसूली पुरावेनिजाम काळात झालेले करारनिजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदीराष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

तसेच नागरिकांकडील पुरावे तालुकास्तरावर तहसील कार्यालयातही सादर करता येईल. सर्व तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुरु करण्यात आली असून वरील पुरावे स्वीकारले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित