जिल्ह्यात जिल्हा परिषदेतंर्गत गट-क सरळसेवा भरती परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

                            जिल्ह्यात जिल्हा परिषदेतंर्गत गट-क सरळसेवा भरती परीक्षा केंद्राच्या

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

लातूर दि.3 ( जिमाका ) :- जिल्हा परिषदेतंर्गत गट - क ( वाहन चालक वगळून) सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 परीक्षा 7 ते 11 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सहा उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून या सहाही परीक्षा  परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात  ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या काळात फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.

नेटीझन्स डिजीटल लातूर, कॉस इन्स्टीट्युट ऑफ कमप्युटर एज्युकेशन लातूर, गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर लातूर, स्वामी विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ पॉलटेक्निक लातूर, संदिपानी टेक्नीकल कॅम्पस कोळपा लातूर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ पॉलटेक्नीक निलंगा या उपकेंद्रावर जिल्हा परिषदेतंर्गत गट-क सरळसेवा भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशामुळे परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या १००मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.

परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडुन परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस,  वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासही त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत