मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समितीच्या लातूर दौरा तारखेत बदल

 मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समितीच्या लातूर दौरा तारखेत बदल

·        26 ऑक्टोबर रोजी समितीचा लातूर दौरा होणार

·        नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन

लातूर, दि. 19 (जिमाका) : मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करीत आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही समिती 21 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येणार होती. आता समितीच्या दौऱ्या कार्यक्रमात बदल झाला असून ही समिती 26 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येणार आहे.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता समितीची बैठक होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसूली पुरावेनिजाम काळात झालेले करारनिजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदीराष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीतअसे आवाहन करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत