रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूरदि. 23 (जिमाका): कृषि विभागामार्फत रब्बी हंगामा अन्नधान्यकडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे. या स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेतअसे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. सर्वसाधन व आदिवासी गटात ही स्पर्धा होईल.

ज्वारीगहूहरभराकरडई व जवस या पिकांसाठी रब्बी पीक स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. तालुकास्तरजिल्हास्तरव राज्यस्तरावरील पीक स्पर्धेत प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपयेआदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

• विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), • ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन

• सातबारा8-अ चा उतारा,  • जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)

• पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा,

•  बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

अशी आहे बक्षिसांची रक्कम

रब्बी पीक स्पर्धेसाठी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपयेद्वितीय बक्षीस तीन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस दोन हजार रुपयांचे राहील. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपयेद्वितीय बक्षीस सात हजार रुपये आणि तिसरे बक्षीस पाच हजार रुपये राहील. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपयेद्वितीय बक्षीस चाळीस हजार रुपये आणि तिसरे बक्षीस तीस हजार रुपये राहणार आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित