महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क

परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

लातूर, दि. 30  (जिमाका) : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023 परीक्षा 9 नोव्हेंबर, 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोनउपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून या सहाही परीक्षा  परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात 9 नोव्हेंबर, 2023  रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट - क परीक्षा लातूर येथील नेटीझन्स डिजीटल व स्वामी विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्निक या उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशामुळे या सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्ती यांना शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.

 परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडुन परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस,  वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासही त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत, असे अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित