लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षक भरती

लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षक भरती लातूर, दि. 28 (जिमाका): येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षकाची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही भरती होणार आहे. इच्छुक माजी सैनिक, पत्नी, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक पाल्यांनी आपला मुळ अर्ज व मूळ कागदपत्रांसह 5 ऑगस्ट, 2025 रोजी मुलाखतीसाठी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित रहावे, निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी कळविले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत