लातूर तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे २१ जुलैला आयोजन

लातूर तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे २१ जुलैला आयोजन लातूर, दि. १८ (जिमाका) : २६ सप्टेंबर २०१२ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार लातूर तालुक्याचा लोकशाही दिन २१ जुलै २०२५ रोजी लातूर तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनास तालुकास्तरीय सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. लातूर तालुक्यातील नागरिकांनी शासकीय कामांसंदर्भात अर्ज सादर करायचे असल्यास, विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतींमध्ये सकाळी ११ ते १२ या वेळेत तहसील कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत