लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालयात लिपिक पदासाठी भरती

लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालयात लिपिक पदासाठी भरती लातूर, दि. 01 : येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालयामध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 10 ऑक्टोबर, 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे स्वत: उपस्थित राहावे. निवड करण्यात आलेल्या उमेवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे, (नि.) यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक (जेसीओज तथा ओआर), माजी सैनिक विधवा व माजी सैनिक युद्ध विधवा यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत