पुनर्रचित फळपिक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
वृत्त क्र. : 442
पुनर्रचित फळपिक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. २ : मृग बहार २०२६-२७ मध्ये लातूर जिल्ह्यात डाळींब, लिंबू, पेरू, सिताफळ आणि चिकू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविली जाणार आहे. ही योजना बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे यांच्यामार्फत कार्यान्वित होईल. शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामान केंद्रांवर नोंदविलेल्या माहितीनुसार सहभागी शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई मिळेल.
अधिसूचित फळपिके आणि महसूल मंडळे
डाळींब: किनगाव, अहमदपूर, खंडाळी, नागलगाव, हेर, औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकुंड, भादा, चाकूर, नळेगाव, वडवळ ना., निलंगा, औराद शहाजानी, कारेपूर, पानगाव.
चिकू: अहमदपूर.
पेरू : अहमदपूर, खंडाळी, शिरूर ताजबंद, हाडोळती, मातोळा, उजनी, बेलकुंड, लामजना, किल्लारी, घोणसी, जळकोट, मुरुड बु.
लिंबू : हेर.
सिताफळ: शिरूर ताजबंद, उजनी, बेलकुंड, आष्टा, औराद शहाजानी, रेणापूर, पळशी, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, हरंगूळ बु., कन्हेरी, मुरुड बु.
विमा संरक्षित रक्कम आणि हप्ता
डाळींब: ₹१,६०,०००/- (हप्ता ₹८,०००/-)
चिकू, पेरू, सिताफळ: प्रत्येकी ₹७०,०००/- (हप्ता ₹३,५००/-)
लिंबू : ₹ ८०,०००/- (हप्ता : ₹४०००/-)
अर्जाची अंतिम मुदत
डाळींब: १४ जुलै २०२६
चिकू व लिंबू : १५ जुलै २०२६
पेरू : १४ जुलै २०२६
सिताफळ: ३१ जुलै २०२६
अर्ज प्रक्रिया
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेत घोषणापत्र आणि अर्ज सादर करावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करावी. अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा, ८ (अ) उतारा, फळबागेचा Geo-Tagging फोटो, भाडेपट्टा करार (आवश्यक असल्यास), आणि बँक पासबुक प्रत सादर करणे बंधनकारक आहे. अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र तातडीने काढण्याचे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल-फ्री क्रमांक १८०० २०९ ५९५९ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment