अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा -२०२६ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य
अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा -२०२६
उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य
लातूर, दि. २ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी, इत्यादी) उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य (सन २०२६-२७) योजना राबविण्यात येत आहे.
सन २०२६-२७ मध्ये (युपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२६ उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबंधितांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनांचे पालन करावे. या योजनेविषयी भविष्यातील सर्व माहिती/सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी काही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपये फक्त व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपये फक्त इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाइन/संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १७ जुलै, २०२६ आहे. अधिक माहितीसाठी अमृत कार्यालय, मयुरेश्वर अपार्टमेंट, पितृछाया बिल्डिंग, पहिला मजला, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर (भ्रमणध्वनी: ७३९१०६५४७०) येथे संपर्क साधावा.
****
Comments
Post a Comment