हरंगुळ बु. येथे ४ जुलै रोजी संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिव्यांगासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा

वृत्त क्र. : 441 हरंगुळ बु. येथे ४ जुलै रोजी संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिव्यांगासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा लातूर, दि. २ (जिमाका): लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि हरंगुळ (बु.) येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी नगर, बरड वस्ती, हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. या रोजगार मेळाव्यात लातूर येथील साईबाबा जनता सहकारी बँक लि., ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रा. लि., सुजया एंटरप्रायझेस (जया ह्युंदाई), अजय फार्म मेकॅनायझेशन, राजयोग बजाज, राजयोग ऑटो प्रा. लि., राजयोग मोटर्स एलएलपी, राजर्षी फाउंडेशन, जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. आणि बघिरा गारमेंट या नामांकित आस्थापना प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या विविध आस्थापनांमध्ये १८ ते ३५ वर्षे वयोगटातील दिव्यांग उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता १२ वी, कोणतीही पदवी, डिप्लोमा तसेच आय.टी.आय.च्या इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, ड्रेस मेकिंग आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड्सची असणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र दिव्यांग उमेदवारांनी ४ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजता थेट मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक बायोडाटा आणि पासपोर्ट साईज फोटो यांच्या प्रत्येकी पाच प्रती (झेरॉक्स) सोबत घेऊन मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने उमेदवारांना काही अडचण असल्यास, त्यांनी मार्गदर्शन केंद्रातील दत्तात्रय कांबळे (मो. ९०२८२३८४६५), लहू भंडारे (मो. ८०५५९९२९००) आणि प्रवीण वाघमारे (मो. ९९२२९२५८९५) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच विशेषतः कर्णबधिर व दिव्यांग उमेदवारांच्या मदतीसाठी सिद्धांत मंडाळे (मो. ९६३७९२०६६५) व आकाश मगर (मो. ८२३७३२०८४९) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन लातूरचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन