विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘ओपीडी’ दिवाळी सणात दोन दिवस राहणार बंद; आपत्कालीन सेवा २४ तास सुरु

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘ओपीडी’ दिवाळी सणात दोन दिवस राहणार बंद; आपत्कालीन सेवा २४ तास सुरु लातूर, दि. ०४ (जिमाका) : दिवाळी सणानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये घोषित करण्यात आलेल्या स्थानिक सुट्टीमुळे बंद राहील. तसेच मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी दीपावली पाडव्याची शासकीय सुट्टी असल्याने ओ.पी.डी. सेवा बंद राहील. रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी नेहमीप्रमाणे साप्ताहिक सुट्टीमुळे ओ.पी.डी. बंद राहणार आहे. शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६, सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेत सुरू राहील. तसेच बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व ओ.पी.डी. सेवा पूर्ववत आणि नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास सुरु राहणार आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरड यांनी कळविले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत