जिल्ह्यात औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात लातूर,दि. 30: भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे दिनांक 5 सप्टेंबर 2016 व सहमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 19 सप्टेंबर 2016 रोजीच्या पत्रान्वये दिनांक 01 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम लातूर जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात येणार आहे. तरि जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षक मतदारांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे. पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे :- (1) मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक 01 ऑक्टोबर 2016 (2) मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोट...
Posts
Showing posts from September, 2016
- Get link
- X
- Other Apps
मांजरा नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा लातूर,दि. 25 : लातूर शहराला पाणीपुरवठा करणा-या धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणी पातळी दिनांक 25 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 6.00 वाजता 640.40 मिटर इतकी असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 58.77 टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून येवा याप्रमाणेच येत राहिला तर येत्या 24 तासात मांजरा धरण निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा मांजरा नदीमार्गे सोडावा लागणार आहे, तरि मांजरा नदीकाठांवरील शेतकरी व नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. तरि याबाबत नदीकाठावरील गावांमधील सर्व नागरिकांनी व शेतक-यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी, लातूर पाटबंधारे विभाग-1, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. ****
- Get link
- X
- Other Apps
तावरजा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा लातूर,दि. 25 : जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्प धरणाची पातळी दिनांक 25 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.00 वाजता 612.20 मिटर असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 82.11 टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून येवा ( इनफ्लो) असाच राहिला तर येत्या 24 तासात धरण निर्धारीत पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तावरजा नदी मार्गे सोडण्यात येणार आहे. तरि तावरजा नदी काठावरील शेतकरी तसेच नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी, लातूर पाटबंधारे विभाग-1, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे ****
- Get link
- X
- Other Apps
ना. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडून प्रशासनास शेती पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश लातूर,दि. 25 : जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबर 2016 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय कृषि व पदुम (पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय) विभाग दिनांक 05 जुलै 2016 मधील मार्गदर्शक सुचनानुसार खरीप हंगाम 2016 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी व्यवस्थापक, इफको टोकीयो जनरल इन्सुरन्स कंपणी लि. व जिल्हा प्रशासनास कौशल्य विकास व उद्योजकता कामगार,भुकंप पुनर्वसन, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निर्देश दिलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये साथरोगांचा फैलाव होऊ नये याकरिता आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे निर्देश ही त्यांनी दिले आहेत. ****
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमास सुरुवात लातूर,दि.20: भारत निवडणुक आयोग नवी दिल्ली यांच्याकडून दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष पुन:रिक्षक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश नवीन मतदार नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे. सदर मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम दिनांक 16 सप्टेंबर 2016 ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राबविला जाणार आहे. मतदार याद्या पुन:रिक्षण प्रभाविपणे राबविण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नमुना -6 :- मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनाक 16 सप्टेंबर 2016 रोजी प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादित आपले नाव आहे का नाही ? याची खात्री...
- Get link
- X
- Other Apps
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांच्या सहकार्याची गरज -कामगारमंत्री सभाजी पाटील-निलंगेकर लातूर,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपुर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेऊन मराठवाड्याच्या सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषिविषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील ह...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयातील नागरिकांनी पासपोर्ट कॅम्पच्या सुविधेचा लाभ घ्यावा - खासदार सुनिल गायकवाड लातूर दि.17: जिल्हयातील नागरिकांना पासपोर्टसाठी नागपुर येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. परंतू जिल्हाधिकारी कार्यालयात 17 व 18 सप्टेंबर 2016 या कालावधीत पासपोर्ट कॅम्प आयोजित करण्यात आला असून या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्य...
- Get link
- X
- Other Apps
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पोले यांच्या हस्ते ध्वजारोहण लातूर,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे,उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव,जिल्हा नियोजन अधिकारी एस.बी.कोलगणे,जिल्हा उपनिवडणूक अधिकारी प्रताप काळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत परिसरात ध्वजाराहेण येथील शिवाजी चौक परिसरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते सकाळी 8.20 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी श्री.विधाते, समाज कल्याणचे शिवकांत चिर्कुते, वरिष्ठ भुवैज्ञानिक श्री.शेख, उपसंचालक सामाजिक वनीकरण सुर्वणा माने यांच्यासह महसूल व प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाचे प्र...
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा लातूर,दि.15: सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नदी, नाले, ओढे इ. मधून पाणी वाहत असताना शेतक-यांनी, शालेय व लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे प्रशासनाने सुचित केले आहे. मांजरा नदीपात्रातून तगरखेडा बॅरेज मध्ये पाण्याचा येवा सुरु असल्याने तगरखेडा बॅरेज तुडंब भरले असून गेट उघडून पाणी सोडण्याची कार्यवाही निम्न तेरणा कालवा विभाग क्रमांक 2 यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच मसलगा तालुका निलंगा येथील मसलगा प्रकल्पातूनही दिनांक 15 सप्टेंबर 2016 पासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. अजून दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. तरि जिल्ह्यातील सर्व नदीकाठ परिसरातील सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने...
- Get link
- X
- Other Apps
संवादपर्व अभियानाच्या माध्यमातून खोपेगावच्या ग्रामस्थांचे शासकीय योजनांबाबत प्रबोधन लातूर,दि.13: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय लातूर व खोपेगाव येथील संजिवणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामस्थांना संवादपर्व अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले. खोपेगाव ता. लातूर येथे आयोजित संवादपर्व अभियानात उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी आर.आर शेख, तालुका कृषि अधिकारी बी. व्ही. वीर, लातूर तहसिलचे नायब तहसिलदार बी. एल. रुकनर, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेचे पुष्पराज खुबा, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सरपंच श्रीपती जांबळदारे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अनिरुध्द मोरे, खोपेगाव संजिवणी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर सादले, अमोल घायाळ यांच्यासह युवक, युवती, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय कृष...
- Get link
- X
- Other Apps
गाव विकासाचा किमान 25 वर्षाचा विकास आराखडा तयार करावा कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर लातूर, दि.06: प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या गावामध्येच रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. त्याकरिता गावातील तरुणांनी एकत्रीत येऊन गाव विकासाकरिता आवश्यक विविध योजनांचा पुढील 25 वर्षाचा विचार करुन प्रारुप विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन कामगार व कौशल्य विकास मंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील महावितरण कंपनीच्या 33 के.व्ही उपकेंद्राचे उद्घाटन व अनसरवाडा जोड रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पांड...
- Get link
- X
- Other Apps
शिक्षणाचा मूळ गाभा राष्ट्रहीतच असलं पाहीजे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूर,दि.5: शिक्षणाचा मूळ गाभा हा राष्ट्रहीतच असला पाहीजे व शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडून सामर्थशाली राष्ट्र निर्मिती मध्ये योगदान द्यावे असे आवाहन कामगार, भुकंप पुर्नवसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. जिल्हा परिषदेमार्फत दयानंद सभागृहात आजच्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार टी. पी. कांबळे, वैजनाथ शिंदे, जिल्हा परिषदेचे माज...
- Get link
- X
- Other Apps
सर्व मागासवर्गीयांचे लोकांचे कबाले त्वरीत द्यावेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड लातूर, दि.03: लातूर शहरातील खाडगाव गायरान अंतर्गत येणा-या गायत्री नगर भागातील सर्व मागासवर्गीय लोकांची अतिक्रमणे नियमीत करुन त्याबाबतचे कबाले त्वरीत देण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले. गायत्री नगर येथील हनुमान मंदीराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. राठोड बोलत होते. यावेळी खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी, आमदार प्रकाश अबाटीकर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व या भागातील नागरिक उपस्थित होते. ...
- Get link
- X
- Other Apps
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची वैद्यकीय महाविद्यालयास भेट व पाहणी लातूर, दि.03: महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन तेथील आरोग्य सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी श्री.राठोड यांनी महाविद्यालयातील एम.आर.आय.युनीट ची पाहणी करून प्रतिदिन किती रुग्णांना एम.आर.आय.ची सेवा दिली जाते याची माहिती महाद्यिालयाचे डीन डॉ.शिंदे यांच्याकडून घेतली.व या आरोग्य सुविधेचा लाभ जास्तीत जास्त गरीब रुग्णांना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महाविद्यालयातील आय.सी.यु.कक्षाची पाहणी करुन हया कक्षात आवश्यक असलेल्या सर्व आरोग्य सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने रुग्णांना उपलब्ध करुन देण्याची सुचना श्री.राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला केली. यावेळी खासदार अरविंद सावंत,आमदार अजय चौधरी,आमदार प्रकाश अबाटीकर,जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, डॉ शिंदे,अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर,उपविभागीय अधिकारी प्रताप काळे,तहसिलदार संजय वारकड,श्र...
- Get link
- X
- Other Apps
प्रशासनाने सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबतचे पंचनामे त्वरित करावेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड लातूर, दि.03: जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करतांना सोयाबीन पिकांवर खोड आळीचा प्रार्दुभाव झाल्याचे आढळून आलेले असून त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे. तरि प्रशासनाने सोयाबीनच्या नुकसानीबाबतचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम अनुषंगाने आयोजीत आढावा बैठकीत दिले. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आमदार प्रकाश अबाटीकर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, अप्पर जिल्हाधिकारी पुरु...
- Get link
- X
- Other Apps
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पेठ येथे वृक्षारोपण नागझरी बॅरेजला भेट लातूर, दि.02: महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पेठ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येऊन यावेळी विविध शालेय प्रमाणपत्र व सातबाराचे ही वाटप त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, श्री. संजय सावंत, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड, श्री.नागेश माने, श्री.संतोष सोमवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. महसूल विभागामार्फत पेठ येथील शेतक-यांच्या सातबारा वरील कर्जाचा बोजा कमी करण्यात आलेला आहे, अशा काही शेतक-यांना प्रातिनिधीक स्वरुपात महसूल राज्यमंत्री राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये आण्णासाहेब पाटील व हंसराज साळूंके या दोन शेतक-यांच्या सातबाराचा 1 लाखाच्या कर्जाचा बोजा कमी केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आ...